श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
- ☆ रंजना जी यांचे साहित्य # 55 – हौताम्य पूजन ☆
क्रांती कारकांचे, करूनी स्मरण
हौताम्य पूजन, लवलाही…!
भगतसिंगाचे, प्रेम, दिलदार
सुखदेव यार, राजगुरु….!
त्रिकूट मैत्रीचे, स्वातंत्र्याचे दूत
भाग्यवान पूत, क्रांतीकारी….!
भारत मातेचे, पुत्र भाग्यवंत
जाणुनिया खंत, माऊलीची
तोडण्या शृंखला, तव चरणाच्या,
सुखे मरणाच्या, दारी जात…..!
वंदे मातरम , होता जयघोष,
उडाले ते होश, जल्लादाचे.,….!
केले प्राणार्पण, गेलें फासावर
निष्ठा कार्यावर, सेवाव्रती….!
तेवीस मार्चचा, बलिदान दिन,
आक्रोशले जन, भारतीय …..!
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈