सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 78 ☆
☆ हायकू ☆
वेल्हाळ पक्षी
स्वप्नातल्या गावात
मन मोहात
********
फुलपाखरू
अंगावर बसलं
फूल हसलं
******
एक साळुंकी
खुपच आवडते
का रडवते ?
******
नार शेलाटी
बाजिंदी मनमुक्त
होईल व्यक्त
****
हिर्वी बाभळ
डोहाच्या काठावर
त्या वाटेवर
****
पिवळी फुले
झुलतात फांदीत
मन गंधीत
****
वाकडी वाट
चिमुकले ते खेडे
फुलांचे सडे
****
काळी कपिला
सुन्दर तिचे डोळे
दूध कोवळे
****
तो निवडुंग
गावाच्या वाटेवर
काटेसावर
****
मस्त साकुरा
फुलतो जपानला
गंध मनाला
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
हाइकु विधा में अप्रतिम रचनाएँ
धन्यवाद सर !?