सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 79 ☆
☆ मधुरा -चतुरा ☆
(वृत्त-तोटक)
सहजा सहजी कळले मजला
धरणी फिरते असुनी अचला
हलके हलके अवघा बरसे
तरसे तरसे मन हे तरसे
सरिता अधिरा बनुनी झरते
दरिया हृदयी शिरते रमते
फुलती झुलती लतिके वरती
भ्रमरासह त्या रमती गमती
ललना असती चतुरा इथल्या
भरण्या जल ही निघती पहिल्या
कळशी कळशी भरते सरते
जगणे मरणे सहजी नसते
वनिता तनुजा असती दुहिता
इकडे तिकडे बनती अजिता
बिजली असती, असती अशनी
फुलती फळती अवनी वरती
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अप्रतिम रचना
धन्यवाद सर ?