सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 80 ☆
☆ नवीन वर्षा …. ☆
नवीन वर्षा नवीन आशा घेवून ये आता
मनात माझ्या सदैव श्रद्धा होवून ये आता
जुनाट झाल्या पहाट वेळा सूर्यास सांगा ना
उन्हात ओल्या दवास ताज्या प्राशून ये आता
खुणा सुखाच्या किती विखुरल्या सांडून दुःखाला
तसाच तू ही उनाड वारा होवून ये आता
मलाच ठावे कशा कुणाच्या नजरा विषारी त्या
पियुष मिळावे तुझे दयाळा धावून ये आता
नवीन वर्षा नकोच आहे फुकटी उधारी ती
तुला हवी ती लगेच रोकड पेरून ये आता
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
नववर्ष पर अप्रतिम एवं विचारणीय रचना
धन्यवाद सर