श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #62 ☆
☆ सांजवारा ☆
अताशा अताशा जगू वाटते
तुझा हात हाती धरू वाटते.
नदीकाठ सारा खुणा बोलक्या
तुझ्या सोबतीने फिरू वाटते.
किती प्रेम आहे, नको सांगणे
तुझी भावबोली, झरू लागते.
कितीदा नव्याने तुला जाणले
तरी स्वप्न तुझे बघू वाटते.
छळे सांजवारा, उगा बोचरा
नव्याने कविता, लिहू वाटते. . !
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈