श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #66 ☆
☆ स्मृती चिन्ह…! ☆
कविसंमेलन गाजवून
घरी गेल्यावर
माझी माय ,
माझ्या हातातल्या स्मृती चिन्हांकडे
निरखून बघते . . . !
माझ्या चेह-यावरचा आंनद
काही क्षण डोळ्यात
साठवते … !
आणि हळूच विचारते
आज तरी . .
नाक्यावरच्या वाण्याचा
उधारीचा प्रश्न मिटणार का..?
मी चेह-यावरच आनंद
तसाच ठेऊन
दहा बाय दहाच्या खोलीत
ठेवलेल्या सगळ्या स्मृती चिन्हांवर
नजर फिरवतो,
तेव्हा वाटतं
ह्या स्मृती चिन्हांच्या बदल्यात
जर वाण्याच्या उधारीचा प्रश्न
मिटला असता तर किती
बरं झाल असतं….!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈