सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 87 ☆
☆ माझी मराठी ☆
नाजूक कोवळी
शुद्ध अन सोवळी
मौक्तिक,पोवळी
सदाशिव पेठीय
माझी मराठी….
पी.वाय.सी. बाण्याची
क्रिकेट च्या गाण्याची
खणखणीत नाण्याची
डेक्कन वासीय
माझी मराठी…..
काहीशी रांगडी
उद्धट,वाकडी
कसब्याच्या पलिकडची
जराशी अलिकडची
‘अरे’ ला ‘कारे’ ची
माझी मराठी….
वाढत्या पुण्याची
काँक्रीट च्या जंगलाची
सर्वसमावेशी,जाते दूरदेशी
इंटरनेट वरची माझी मराठी…..
© प्रभा सोनवणे
१४ फेब्रुवारी २०११
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
धन्यवाद हेमंतजी!