श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 87 ☆
☆ मी मराठी ☆
मी मराठी तू मराठी
मातृभाषा ही मराठी
घेउया रे शपथ आपण
जागवूया ही मराठी
हो मुकुंदानेच केला
श्रीगणेशा हा मराठी
ग्रंथ पहिला साक्ष ठेवी
आपल्यासाठी मराठी
चक्रधर स्वामी कवीश्वर
आद्य दैवत हे मराठी
पद्य ग्रंथांचा गणेशा
आणि पाया ते मराठी
ज्ञानियांची ज्ञानभाषा
आपुली आहे मराठी
घेउनी सौंदर्य फिरते
आज जगती ही मराठी
व्याकरण हे सोबतीला
गाठते उंची मराठी
चिन्ह देती अर्थ त्याला
शोभते त्याने मराठी
घालते खेटेच आहे
राज दरबारी मराठी
खंत ही अभिजात नाही
होत का अजुनी मराठी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈