सुश्री प्रभा सोनवणे
साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 120
☆ वृत्त – मेनका ☆
मी अशी का गोंधळाया लागले
बोल माझे अडखळाया लागले
वाट माझी वेगळी होती तरी
का बरे इकडे वळाया लागले
मेनका मोठी अनोखी अप्सरा
कन्यकेला आकळाया लागले
तू तिथे आहेस एकाकी जरी
चंद्र तारेही जळाया लागले
लावल्या पैजा जरी त्यांनी किती
मोल त्याचेही ढळाया लागले
वेगळी आहे कहाणी आपली
शेवटी आता कळाया लागले
ठेव तू बांधून पाण्याला तिथे
डोह आता खळखळाया लागले
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈