श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । साप्ताहिक स्तम्भ अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक भावप्रवण एवं सार्थक कविता “हिरवी चादर”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 10 ☆
हिरवी चादर
स्वाती नक्षत्राचा थेंब
असे चातकाचा प्राण
एका थेंबात भिजतो
त्याचा आषाढ श्रावण
धरतीचं हे काळीज
फाटते हो ज्याच्यालाठी
भावविश्व गंधाळते
जेव्हा होती भेटीगाठी
तिच्या डोळ्यात पाऊस
त्याची वाट पाहणारा
त्याचा खांदा हा शिवार
तेथे बरसती धारा
माझ्या घामाच्या धारांना
तुझ्या धारांचा आधार
काळ्या ढेकळांची व्हावी
येथे हिरवी चादर
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८