श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक सामयिक एवं सार्थक कविता “शुद्र मागण्या*”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 14 ☆
शुद्र मागण्या*
हवा कशाला रंग नि कागद
हृदयावरती चित्र काढण्या
नजर एकदा टिपून घेते
साऱ्या बाबी अशा देखण्या
तुझे देखणे रूप मनोहर
नकोच अंबर नको चांदण्या
ओठांवरती मधाळ पोळे
पराग जाऊ कशा शोधण्या
पानामागे खरडुन पाने
हृदयी टोचू नको टाचण्या
हृदयाचे हृदयी प्रक्षेपण
नको पाठवू पत्र वाचण्या
अंधाराशी वाद न काही
त्याच्या काही शुद्र मागण्या
काळोखाशी भिडेल मी या
मिटून घे तू तुझ्या पापण्या
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८