कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है उनके फेसबुक पेज से साभार एक भावप्रवण कविता माझी कर्मभूमी… . . ! )
☆ माझी कर्मभूमी… . . ! ☆
माझी कर्म भूमी, संस्काराचा गाव,
मानव्याचे नाव, देऊ त्याला. . . . . !
वागायचे कसे , बोलायचे कसे
दिसायचे कसे, शिकविले. . . . !
अनुभव देई , रोज नवे धडे
तारतम्य घडे, जीवनात .. . . !
नको बडेजाव, नको अभिमान
व्यर्थ गुणगान, श्रीमंतीचे. . . !
स्वातंत्र्याधिकार , आहे प्रत्येकास
व्यक्ततेची आस, कर्तृत्वात. . . . !
मायाजाल देई, विकारांचे जल
तिथे कर्मफल , जन्मा येई. . . . !
कर्मभूमी माझी, माझा परीवार
स्वार्थाचा विचार घात करी. .. . . !
मती आणि गती, विचारांचे जाते
माणसाशी नाते , जोडलेले. . . . !
कुटुंबास हवा , आधाराचा हात
कर्तव्याची बात, चुको नये. . . !
कर्मभूमी देई, पद, पैसा, किर्ती
आदर्शाची मूर्ती, स्मरणात. . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.