श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. आज उनकी कविता धार्मिक एवं सामयिक है. उनके ही शब्दों में – “श्री छत्रपती शिवरायांना भवानी मातेने प्रसन्न होऊन तलवार दिली.म्हणून तुळजाभवानी मातेची “तलवार अलंकार” पूजा नवरात्रात केली जाते. त्या फोटोवरुन रचिलेल्या तुळजाभवानी चारोळ्या” – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे)
☆ श्रीतुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा ☆
छत्रपती शीवाजींना
तलवार ती भवानी
धर्म रक्षणाचेसाठी
दिली प्रसन्न होऊनी !!१!!
श्रीकृष्ण प्रसन्न होता
केली मुरली अर्पण
माता तुळजाभवानी
केले दैत्यांचे मर्दन !!२!!
राक्षसांना मारल्याने
भयभीत देवा सर्व
भवानीच्या मुरलीने
स्वर्ग प्राप्ती अनुभव!!३!!
शक्तीरुप महापूजा
आवर्जून बांधताती
अलंकार महापूजा
होतं असे नवरात्री !!४!!
©®उर्मिला इंगळे, सातारा
दिनांक:-५-१०-१९
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!