लोकमान्य हास्य योग संघाच्या बावीसाव्व्या वर्धापन दिनानिमित्त
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके द्वारा रचित लोकमान्य हास्य योग संघ, पुणे के बावीसवें स्थापना दिवस पर एक कविता “लोकमान्य हास्य योग संघ वर्धापनदिन”। कविता का प्रकार – मुक्तछंद है। ई- अभिव्यक्ति की और से लोकमान्य हास्य योग संघ, पुणे को बावीसवें स्थापना दिवस पर हार्दिक शुभकामनायें।)
☆0 साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 21 ☆
☆ लोकमान्य हास्य योग संघ वर्धापनदिन ☆
!!श्रीराम!!
!!श्रीगणेशाय नमः!!
!!श्रीशारदायै नमः!!
!! श्री गुरवे नमः!!
कवितेचा प्रकार : मुक्तछंद
चाल:- कविवर्य भा.रा.तांबे यांच्या “सायंकाळची शोभा “या कवितेतील ..
“पिवळे तांबुस ऊन कोवळे ,पसरे चौफेर..ऽऽ”
या चालीवर.
लोकमान्य हास्ययोग संघाच्या आम्ही नित्य इथे जमुनी ऽऽ
हा हा हो हो उगाच नाही करीत साऱ्याजणी !!१!!
व्यर्थ न जमतो येथे आम्ही फक्तचि हसण्याला ऽऽ
खेळ खेळुनी शिकतो आम्ही सुंदर जगण्याला !!२!!
खेळ खेळतो फुगे फुगवितो पतंगही उडवितो ऽ ऽ
मस्त काटाकाटी करुनिया गंमतचि पाहतो !!३!!
दोहन करितो दो हातांनी दूध पिऊनी टाकितो ऽ ऽ
ताक घुसळुनी लोणी काढुनी गट्टमचि करितो !!४!!
फू फू आवाज करीत आम्ही गालचि ते फुगवुनी ऽ ऽ
फुफुसातली नको ती हवा देतो टाकुनी !!५!!
स्वच्छ मोकळा श्वास घ्यावया तयार होतो आम्ही ऽऽ
वारकरी होऊनी नाचतो रिंगण ते करुनी !!६!!
राग लोभ अहं मद मत्सर हे शत्रू असती सहा ऽऽ
बिघडविती आरोग्य कसे ते सर्वांनी हो पहा!!७!!
त्या शत्रूंना पळविण्यासचि एकचि उपाय ऽऽ
हास्यसंघामध्ये येऊनी त्यांना करा बाय बाय ,!!८!!
हास्यसंघात नियमित येता चेहरा होई गोजिरा ऽऽ
सारे मिळुनी वर्धापन दिन आज करु साजरा !!९!!
” लोकमान्य हास्य योग संघाचा विजय असो !”
©️®️उर्मिला इंगळे, सतारा
दिनांक:-१६-२-२०२०
मो. 9028815585
!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!