सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
श्री आनंदहरी
श्री मुबारक उमराणी
डाॅ.सोनिया कस्तुरे
🖌️🖌️ श्री आनंदहरी, श्री मुबारक उमराणी आणि डाॅ.सोनिया कस्तुरे पुरस्कृत– अभिनंदन 🖌️🖌️
देशिंग (जि.सांगली) येथे नुकत्याच पार पडलेल्या 21व्या अग्रणी साहित्य संमेलनात आपल्या समुहातील साहित्यिकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
श्री आनंदहरी यांच्या कातळकोंभ या कथासंग्रहाला अग्रणी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, श्री मुबारक उमराणी यांच्या जोखड या काव्यसंग्रहाला अग्रणी प्रेरणा पुरस्कार आणि डाॅ. सोनिया कस्तुरे यांच्या नाही उमगत ती अजूनही या काव्यसंग्रहाला अग्रणी प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
💐 पुरस्कार प्राप्त सर्व साहित्यिकांचे ई-अभिव्यक्ती परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! 💐
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती मराठी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈