संपादकीय निवेदन
🪔 ई-अभिव्यक्ती (मराठी) – 🪔 दिवाळी अंक २०२४ 🪔
🪔 दिव्यांची दिवाळी 🪔 आणि जोडीला शब्दांची रांगोळी…🪔🪔
आनंददायी श्रावणमास आला आला म्हणता म्हणता सृष्टीला भरपूर पावसाची भेट देऊन परतूनही गेला. आता लवकरच बाप्पा वाजतगाजत येतील आणि जल्लोषाची .. उत्साहाची आणि आशीर्वादांचीही बरसात करून जातील…. मग येईल प्रसन्न आणि प्रफुल्लित वातावरणाची शिंपण करणारा शारदोत्सव …. … आणि नकळत चाहूल लागेल दीपोत्सवाची ! वर्षभर वाट पाहायला लावणारा …. मुक्तहस्ते तेजाची उधळण करणारा दीपोत्सव …… दिवाळी.
दिवाळी ! अंधारातून प्रकाशाकडे जाण्यास प्रवृत्त करणारे प्रकाशपर्व ! सुगंधी उटणे, अभ्यंगस्नान, सर्व आप्तेष्टांच्या संपू नयेत असं वाटणाऱ्या भेटीगाठी, फराळाने भरलेली ताटे… आनंद आणि फक्त आनंदच. आणि या आनंदात स्वीट-डिश प्रमाणे हवीहवीशी भर घालणारे.. एकूणच दिवाळीच्या या आनंदात मोलाची भर घालणारे साहित्य-समृद्ध दिवाळी अंक.
आपला ई अभिव्यक्ती परिवारही या आनंदात मौलिक भर घालायला सज्ज आहेच. तर मग लागा तयारीला. … तुमच्या उत्तमोत्तम ‘ अक्षर कलाकृती ‘ पाठवा आमच्याकडे आणि सगळे मिळून सजवू या ई-अभिव्यक्तीचा “ दिवाळी विशेषांक. २०२४ ”. या विशेषांकासाठी उत्तम लेख, कथा, कविता, रसग्रहण, पुस्तक परिचय, मनमंजुषा, इंद्रधनुष्य, चित्रकाव्य, प्रतिमेच्या पलीकडले…. यातल्या कुठल्याही एका सदरासाठी आपलं उत्तमोत्तम साहित्य पाठवा…. फक्त वेळेत पाठवा.
यावर्षी कुठल्याही सदरासाठीचे साहित्य पाठवायचं आहे फक्त संपादिका मंजुषा मुळे यांच्याकडे. ( मोबा. नं. ९८२२८४६७६२ ) महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने कोणत्याही एकाच साहित्य प्रकारासाठी साहित्य पाठवावे, आणि ते पाठवतांना ‘ दिवाळी अंकासाठी साहित्य ’ असा उल्लेख आवर्जून करायला विसरु नये. तसेच आपल्या साहित्याखाली स्वतःचे नाव आणि मोबाईल नंबर आठवणीने लिहावा. सर्व प्रकारच्या गद्य लेखनासाठी शब्द मर्यादा आहे २००० शब्दांची…. केवळ २००० शब्द.
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख आहे दि. २८ सप्टेंबर २०२४. या तारखेनंतर आलेले साहित्य या अंकासाठी स्वीकारले जाणार नाही याची सर्वांनी निश्चित नोंद घ्यावी. अर्थात उशिरा आलेले किंवा पृष्ठ-मर्यादेमुळे नाईलाजाने दिवाळी अंकासाठी स्वीकारता न आलेले साहित्य आपल्या दैनंदिन अंकात खात्रीने प्रकाशित केले जाईल हे निश्चितपणे लक्षात असू द्यावे.
वाट पाहात आहोत आपल्या दर्जेदार साहित्याची … फक्त दि. २८ सप्टेंबर २०२४ पर्यंतच. त्यामुळे त्वरा करा. चला, सणांच्या सोहळ्यांबरोबरच आपण साजरा करू हा ‘ अक्षर सोहळा ‘ही … या दिवाळी अंकाच्या रुपानं !
लक्षात असू द्या — कोणत्याही स्वरूपातले प्रत्येकी एकच साहित्य … आणि तेही २८ सप्टेंबरपर्यंतच ! पाठवायचे फक्त मंजुषा मुळे यांच्या व्हाट्सअप वर …. मोबा. नं. ९८२२८४६७६२ यावर. 🙏
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी