सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
नमस्कार,
दि .१ ऑक्टोबर —- आदरणीय महान लेखक आणि महाकवी कै. श्री. ग. दि . माडगूळकर यांचा जन्मदिन—- त्यांना आदरांजली म्हणून त्यादिवशी आपण विशेषांक प्रस्तुत करणार आहोत. ज्यांना त्यासाठी आपले साहित्य पाठवायचे असेल, त्यांनी ते साहित्य संपादकांकडे उशिरात उशिरा रविवार दि. २६/०९/२१ पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावे. म्हणजे ते प्रकाशित करण्याचे व्यवस्थित नियोजन करता येईल. त्यानंतर आलेले साहित्य या विशेषांकात समाविष्ट करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच प्रत्येकाने आपल्याकडच्या विविध सदरांपैकी कोणत्याही फक्त एकाच सदरासाठी साहित्य पाठवावे ही विनंती, जेणेकरून सर्वांच्या साहित्याचा या अंकात समावेश करणे शक्य होईल. कोणत्या संपादकांकडे कोणत्या सदरासाठी साहित्य पाठवायचे याची माहिती सर्वांना आहेच. आणि यासंदर्भात शनिवार दि. १८/०९/२१ च्या अंकासोबतही पुन्हा माहिती दिलेली आहे. कृपया त्यानुसारच साहित्य पाठवावे हे आग्रहाने नमूद करत आहोत. नेहेमीप्रमाणे सर्वांचा भरघोस प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे.
संपादक मंडळ, ई – अभिव्यक्ती (मराठी),
दि. २०/०९/२१
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈