सौ. सुजाता काळे
(सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं । वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी की एक भावप्रवण मराठी कविता ‘फिरूनी जन्म घ्यावा….’।)
☆ फिरूनी जन्म घ्यावा….☆
फिरूनी जन्म घ्यावा,
की जन्मभर फिरावे
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
भरावे मनाचे गगन चांदण्याने,
की व्देषाच्या आगीत स्वतः जळावे,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
रहावे थांबून डोळ्यांच्या किनारी,
की वहावे पूरात स्वतः बुडवावे,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
जगावा प्रत्येक श्वास हृदयाचा,
की मोजक्याच श्वासात स्वतः संपवावे,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
छेडूनी अंतरी तार संगीताची,
की बेसुरी संगतीत स्वतः भिजवावे,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
कवटळून घ्यावे अथांग क्षितिजास,
की कोंडी करावी स्वतःच्या मनाची,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
जगाच्या पसा-सात, पसरूनी हरवावे,
की स्वतःच्या मनी जग निर्माण करावे,
रे मानवा ! तुची रे ठरवावे..
© सौ. सुजाता काळे …
पंचगनी, महाराष्ट्र।
9975577684