सौ. सुजाता काळे
((सौ. सुजाता काळे जी मराठी एवं हिन्दी की काव्य एवं गद्य विधा की सशक्त हस्ताक्षर हैं । वे महाराष्ट्र के प्रसिद्ध पर्यटन स्थल कोहरे के आँचल – पंचगनी से ताल्लुक रखती हैं। उनके साहित्य में मानवीय संवेदनाओं के साथ प्रकृतिक सौन्दर्य की छवि स्पष्ट दिखाई देती है। आज प्रस्तुत है सौ. सुजाता काळे जी की पर्यावरण और मानवीय संवेदनाओं पर आधारित एक भावप्रवण मराठी कविता “आज बाजारात…..”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ कोहरे के आँचल से # 15 ☆
आज पाहिलं
विजेच्या कडाक्यात
जोरदार पावसात
वादळी वा-यात
जख्खड वृक्ष उन्मळून
कोसळला आज बाजारात
आणि एक गरीब शेतकरी
तत्क्षणी जागीच मेला.
फक्त काही जण गलबलले
काही क्षण रेगांळले
पुन्हा काही क्षणात यथावत
आज बाजारात.
काही लोक सरसावले
त्याच झाडाच्या फांद्या,
ढपल्या तोडण्यात
आज बाजारात.
वर्मी लागलेला
तोच बुंधा उचलून नेला
काही पोटं भरण्यासाठी
काही जीव जगवण्यासाठी
आज बाजारात.
मृत्युच्या कारणाला
घरी नेलं गोळा करून
आज पाहिलं…..
मरण सुध्दा जीव जगवतं
कुणाची अश्रु तर कुणा
जीव देऊन जातं……!!
© सुजाता काळे,
Thank you Sir