सौ शालिनी जोशी

? कवितेचा उत्सव ? 

माऊली वसे पंढरपुरी☆ सौ शालिनी जोशी

जगाची माय माऊली वसे पंढरपुरी

 समचरणात पाऊले उभी विटेवरी

*

 कर कटीवरी गळ्यात वैजयंती माळा

 हसू गालावर भाळी शोभे कुंकूम टिळा

 *

माया भरले नेत्र किरीट सुंदर शिरी

कानी लोंबती मत्स्याकृती कुंडले साजिरी

*

रूप हे देखता सहजच कर जुळले

मानस त्या सावळ्या चरणीं अर्पण झाले🙏

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments