मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ओळख” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ओळख” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

☆

सारी सृष्टी गोठवणारा थंडीचा कडाका …. थिजलेलं वातावरण ..

आम्ही आमच्या घरट्याच्या उबेत लपेटलेले .. ..

.. आणि दूर झाडाखाली कुणीतरी ..

.. गारठण्याची संवेदनाच जणू गोठलेला .. ..

.. .. .. बधीरसा .. शरीराने .. अन् मनानेही ।।

 

ग्रीष्माची धगधगती काहील ….सूर्याच्या साक्षीने होरपळणारी सृष्टी ..

आम्ही आमच्या घरट्याच्या सुखद गारव्यात विसावलेले .. ..

.. आणि तिकडे दूर कुणीतरी ..

.. निष्पर्ण झाडाची सावली शोधत ..

.. .. .. अंगांगाची आग उन्हानेच विझवणारा .. केविलवाणा ।।

 

सृष्टीलाच वाहून न्यायला आलेला धुंवाधार पाऊस ….फाटलेलं आभाळ ..

आम्ही आमच्या घरट्याच्या छपराखाली सुरक्षित .. पावसाची गंमत पहात .. ..

.. आणि दूर पलीकडे कुणीतरी ..

.. जणू वाहून जायलाच आलेला ..

.. .. .. पण नशिबाला धरून लोंबकाळणारा .. बिच्चारा ।।

 

 

.. .. .. कोण हा कुणीतरी ?? .. दरवेळी न चुकता दिसणारा ?? .. ..

 

.. .. .. .. अरे हे तर साक्षात दारिद्र्य ….

.. ..  पण भाग्य त्याचं थोर .. ..

.. आम्ही निदान अजून ओळखतोय तरी त्याला ..

.. .. लांबून का होईना .. पण ओळखतोय .. .. ..

☆

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०८ – सुवर्ण पान…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

☆ सुवर्ण पान…! ☆

? कवितेचा उत्सव # ३०८ – विजय साहित्य ?

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ सुवर्ण पान…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(दशाक्षरी)

☆

जाण जगाची, हृदी ठेऊनी

रसिक धामी, रमला नाना

विश्वनाथ हा, कलासक्त हा

सच्चा माणूस, जगला नाना.

*

चित्रपटांचा, बादशाह हा

रंगभूमीचा, नटसम्राट

प्रचंड खस्ता, खात जाहला

दिगंत नाना, शब्द अचाट…!

*

अगम्य याची, संवाद कला

कथानकाची, हृदयी जागा

नाट्य, चित्र ही, प्रवास यात्रा 

माणुसकीचा, अतूट धागा..!

*

हिंदी मराठी, भाषा भगिनी

अनंत रुपी, दिसला नाना

अभिनयाची,असिम उंची

उन्नत झाल्या, रसिक माना.

*

हृदी जनांच्या,नांदत होता

परी ग्रासला, हृद्य विकार

नाना भुमिका, साकारीत हा

इहलोकीच्या, वळला पार

*

बहु आयामी , रेखाचित्र हे

आठवणींचे, सुवर्ण पान

कसे जगावे, सांगून गेला

कलागुणांचे, देऊन दान..!

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ र त न… ☆ ज्योती कुळकर्णी ☆

☆ र त न… ☆

? कवितेचा उत्सव ?

ज्योती कुळकर्णी 

☆ र त न… ☆ ज्योती कुळकर्णी ☆  

(९ ऑक्टोबर रतनजी टाटांचा स्मृती दिन –त्यानिमित्त त्यांना आदरांजली)

(वृत्त:व्योमगंगा)

☆

 कोळशाची खाण मोठी रत्न येथे जन्मलेले

भारताच्या कोहिनूरा तुज अम्हीही वंदिलेले

 *

अस्मिता आहे निराळी, नाळ येथे जोडलेली

धर्म तुमचा पारशी पण वेगळे ना वाटलेले

 *

अल्पसंख्यी येथले पण कार्य तुमचे खूप मोठे

अन पुढे जाण्यास काही ना कुणाचे लाटलेले

 *

ताजहल्ला घाव होता आमच्या देशावरी पण!

तोंड देताना कधी ना देशबंधू सोडलेले

 *

रत्न नावाचा हिरा हा भंगला नाही कधीही

राहिले ना काळजाशी काळजाला जोडलेले

 *

देत ‘टाटा‘ या जगाला, राहिले पण येथ कायम!

भारतीयांच्या मनी अन मानसी घर थाटलेले

 *

देशप्रेमींच्या मनी ध्रुव पद मिळाले ना तुम्हाला

स्वर्गवासी जाहले, अश्रूस आम्ही ढाळलेले

☆

©  ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
2

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हाय रे कर्मा.. ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हाय रे कर्मा.. ? श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

खूष करता करता पितरांना

जीव हकनाक माशांचा गेला,

बाणगंगेच्या पवित्र तलावात 

मत्स्यभेद त्यांच्या विधीने केला!

*

मृत पानफळांचे क्रियाकर्म,

कोण-कधी-कुठे-कसे करणार?

पाप जिवंतपणीची धुता धुता 

गाठी पुण्य कसे जमा होणार?

*

जरी पाऊल ठेवले विज्ञानाने 

अनेक अतिदूरच्या ग्रहगोलावर,

अंधश्रद्धेचा खोल पगडा आहे 

अजून मूढ जनांच्या मनावर!

*

पुण्यकर्म करतांना सांगोवांगीचे 

नको पर्यावरणाकडे काणा डोळा,

नाहीतर कळणार नाही मंद मानवा

कधी आवळेल तो तुझा गळा!

कधी आवळेल तो तुझा गळा!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बहुगुणी अंबाडी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बहुगुणी अंबाडी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत- वर्णसंख्या १६यति ९ व्या अक्षरावर)

☆

पानी खुदकन हसली लाल कळी देखणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||ध्रु||

*

पर्णिकेत औषधी सारी नाम तिचे अंबारी 

व्यंजनात भाजी साजरी पुष्प पाकळी न्यारी

कात्यायनी म्हणती कोणी नवरात्री मागणी 

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||१||

*

पंचदली किती देखणी हिरवाई कोंदणी

दोऱ्या कागद सतरंज्या अंबाडी बहुगुणी

सुमने ही लोभसवाणी रूपखणी मोरणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||२||

*

आंबट चवीची अन्वष्टा मना ओढ लावते

मंत्रमुग्ध होऊन मीही तिच्या रुपा पाहते 

अलंकार शब्दांचे सारे देते मम् लेखणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||३||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३३ ☆ पितृपक्ष… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३३ ?

☆ पितृपक्ष… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

पूर्वी रोज यायचा कावळा —

न चुकता,

तुम्ही असताना …

आणि तुम्हीही,

अंड्यातला पिवळा बलक —

देऊन टाकायचे दररोज त्याला !

तो यायचाच,

काव काव करत… नाष्ट्यासाठी!!

 

पण तुम्ही गेल्यापासून,

कावळा येत नाही दारात!

त्यालाही कळलं असावं,

 

आपला अन्नदाता–

निघून गेल्याचं !

 आता पितृपक्षातही येत नाही तो

दहीभाताची उंडी खायला!

कावळा तृप्त झालाय… की,

तुम्हाला मोक्ष मिळालाय?

सारे अनाकलनीय!

मला तरी !

☆

© प्रभा सोनवणे

६ ऑक्टोबर २०२६

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्मा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्मा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

☆

सर्वाभूती एकचि

वसे तो आत्मा

नाही विभक्त

दुस-या पासोन..

 

गंधही नाही

कुटीलतेचा तया

विचार अन् वाणीला,

विमल अमर तो बघा..

 

नाते येथ विश्वासाचे

पावित्र्य नांदे,

नाही असत्याचा

स्पर्शही तया…

 

न जळे न उडे

न भिजे कधीही

ऐशा पावन आत्म्यास

साधनेचे द्यावे बल…

☆

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४३ ☆ साक्षर केली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४३ ?

☆ साक्षर केली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

मेघाने या काल पालथी घागर केली

काळी माती त्याची हिरवी चादर केली

*

वाघावाणी वागायाची काल लेक ही

वाघीणीची या लोकांनी मांजर केली

*

घर सावरण्या मीही थोडा दिलाय टेकू

छिलून माझ्या देहाची मी पाचर केली

*

पीठ घ्यायला खिशात नव्हते पैसे माझ्या

पोरांसाठी मग कोंड्याची भाकर केली

*

सावित्रीने काल सोसल्या हाल अपेष्टा

नवी पिढी ही या मातेने साक्षर केली

*

वयोपरत्वे किती बदलला सूर तुझा रे

गाताना तू कटु शब्दांची साखर केली

*

तुझ्याकृपेने मला मिळाले वैभव देवा

एक विनवणी जगतासाठी सादर केली

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीगणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

श्रीगणेश जाताना

काळजास दुःख आहे

पुन्हा आगमनाची

भक्ती रुख रुख आहे.

*

पुजा पाठ नेवैद्य

आरतीत तोच आहे

देवळी मुर्ती विना

अप्रसन्न पेच आहे.

*

आरास गजबज

सारे कसे शांत होई

मन  खाई मनास

क्षण क्षण खंत देई.

*

देवाधिराज देव

गजानन बुध्दि दाता

विरह जणू युग

आशिर्वाद दुर होता,

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पितृपक्ष ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पितृपक्ष ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान!

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares