मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बालकाची विनवणी.. ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बालकाची विनवणी.. ? श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

नैवेद्याच्या नावाखाली 

पडे पूर्णब्रह्म चौथऱ्यावर,

निर्जीव दगडांच्या देवासाठी

मात्र पंचपक्वानांचा आहार!

*

फाके पडती घरच्यांना 

त्यात पडला हा दुष्काळ,

तुझ्या नशिबात मात्र देवा 

असे फुकटचा सुकाळ!

*

तुझ्याच घरची आम्ही फुले 

ठेवतोस का आम्हां उपाशी?

सदा भुकेले ठेवून आम्हाला 

तूच का बरे जेवावे तुपाशी?

*

दिसताच सुग्रास भोजन 

नजर त्याच्यावर पडली,

एवढे सगळे तू कसे खाणार 

बाल मनात शंका आली!

*

प्रसाद समजून घेतो थोडं 

भूक घरच्यांची भागवतो,

चोरी समजू नको तू याला 

एवढे एकच तुज विनवितो!

एवढे एकच तुज विनवितो!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पोपटाची चोच… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पोपटाची चोच… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

भावगीत – (वर्णसंख्या १२ यति ६ व्या अक्षरावर)

☆

पोपटाची चोच वेलीत साजरी 

पानात कलिका दिसली लाजरी ||ध्रु||

*

 उन्हाळा फुलाला मानवतो फार 

 वसंत ऋतूत असतो बहार

 स्वागत गुच्छात कोयरी कोयरी 

 पानात कलिका दिसली लाजरी ||१||

*

 कुसुंबी तांबूस पिवळी पाकळी 

 बरगंडी रंगी एक एक कळी

 हिरव्या पानात सोनेरी शेंदरी 

 पानात कलिका दिसली लाजरी ||२||

*

 लटके झुंबर वेलींचे सुंदर 

 पोपट केळी ही त्यात मनोहर

 पाचूच्या कोंदणी लावण्य सुंदरी

 पानात कलिका दिसली लाजरी ||३||

*

 पोपटाचे फूल मनात भरले

 कवन त्यावर साजरे स्मरले 

 शब्दांचे मनोरे त्यात भरजरी

 पानात कलिका दिसली लाजरी ||४||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शिवथरघळ धबधबा… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शिवथरघळ धबधबा... ? शालिनी जोशी ☆

☆

मिरवी हरित वैभव 

 निसर्गरम्य शिवथर 

 समर्थांच्या निवासे

 पावन हा परिसर 

 जलप्रपात देखणा 

 धबाधबा वाहे

 काळ्या खडकाला 

 शान त्याची आहे 

 पाणी नव्हे हे

 ओघ जणूं क्षीराचे

 तुषार उडवीत चाले

 नर्तन जलबिंदूचे 

 पाहणारा चकीत

 दर्शने जलात्कारा

 समर्थांच्या ग्रंथकार्या 

 साक्षी तोच खरा 

☆

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जागर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जागर ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

आदिमाया तुझा | मांडला जागर |

भक्तीचा सागर | नवरात्र ||१||

*

घटस्थापनेस | देवी बैसे घटी |

ताराया संकटी | भक्तगणां ||२||

*

देवी आनंदाने | मागतो जोगवा |

दारोदारी धावा | नऊदिनी ||३||

*

खणा नारळाने | भरतो ही ओटी |

भक्तीभाव दाटी | ह्रदयात ||४||

*

फुले हार वेणी | माळ घटावर |

सप्तधान्य घेर | भोवताली ||५||

*

उपवास व्रत | कठोर साधना |

उद्धारते मना | तपश्चर्या ||६||

*

उदो उदो देवी | शक्तीने प्रहार | 

दुष्टांचा संहार | रक्षणासी ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पदर… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ पदर… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

आईचा असो वा साडीचा

 सन्माननीय असतो पदर

 साडीचा पदरात सौंदर्य

 आईच्या पदरी असे आदर!

*

साडी परिधान करते जी

 पदर सावरणे असे भान

 पदर जिचा नीट असतो

 सनातनाचा तो सन्मान!!

 *

साडी म्हणजे सात्विकता

 साडीमधे वेगळाच डौल

 विदेशी परिधान सोप्प तरी

 देशी बाजाच ह्रदयस्थ मोल!!

 *

गोल साडी सुटसुटीत तर

 गुजराथी साडी वाटते छान

 केरळ कर्नाटकी साड्यामधे

 काठापदराच वेगळच भान!!

 *

नऊवारी महाराष्ट्रीय साडी

 परिधान करणे जरा अवघड

 तीच साडी साड्यामधला

 जिंकून जाते सगळे गड!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हाय रे कर्मा.. ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हाय रे कर्मा.. ? श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

खूष करता करता पितरांना

जीव हकनाक माशांचा गेला,

बाणगंगेच्या पवित्र तलावात 

मत्स्यभेद त्यांच्या विधीने केला!

*

मृत पानफळांचे क्रियाकर्म,

कोण-कधी-कुठे-कसे करणार?

पाप जिवंतपणीची धुता धुता 

गाठी पुण्य कसे जमा होणार?

*

जरी पाऊल ठेवले विज्ञानाने 

अनेक अतिदूरच्या ग्रहगोलावर,

अंधश्रद्धेचा खोल पगडा आहे 

अजून मूढ जनांच्या मनावर!

*

पुण्यकर्म करतांना सांगोवांगीचे 

नको पर्यावरणाकडे काणा डोळा,

नाहीतर कळणार नाही मंद मानवा

कधी आवळेल तो तुझा गळा!

कधी आवळेल तो तुझा गळा!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बहुगुणी अंबाडी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बहुगुणी अंबाडी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत- वर्णसंख्या १६यति ९ व्या अक्षरावर)

☆

पानी खुदकन हसली लाल कळी देखणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||ध्रु||

*

पर्णिकेत औषधी सारी नाम तिचे अंबारी 

व्यंजनात भाजी साजरी पुष्प पाकळी न्यारी

कात्यायनी म्हणती कोणी नवरात्री मागणी 

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||१||

*

पंचदली किती देखणी हिरवाई कोंदणी

दोऱ्या कागद सतरंज्या अंबाडी बहुगुणी

सुमने ही लोभसवाणी रूपखणी मोरणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||२||

*

आंबट चवीची अन्वष्टा मना ओढ लावते

मंत्रमुग्ध होऊन मीही तिच्या रुपा पाहते 

अलंकार शब्दांचे सारे देते मम् लेखणी

श्वेत गुलाबी रंगावली भासे जणू चांदणी ||३||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पितृपक्ष ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पितृपक्ष ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

हिंदू धर्म सांगे | पितरांचे ध्यान |

भोजनाचे पान | पितृपक्ष ||१||

*

सात्विक विचार! चालवती श्राद्ध |

मुक्तीचे प्रारब्ध! पूर्वजांचे ||२||

*

पूर्वपार त्यांनी | जपली संस्कृती |

जीवन स्विकृती | संस्कारांची ||३||

*

काकस्पर्शसाठी | कावकाव साद |

दयावे आशिर्वाद | वारसांना ||४||

*

पंधरवाड्यात | चाले दानधर्म |

दातृवाचे कर्म | स्मरणाने ||५||

*

चौऱ्याऐंशी लक्ष | योनींचे भ्रमण |

जन्मलो आपण | मुक्तीसाठी ||६||

*

हिंदूनी जपावी | संस्कृती महान!

पितरांचे भान | कृतज्ञता ||७||

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करारनामा फक्त चुकला !  श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? करारनामा फक्त चुकला ! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

ह्रदयाच्या बिऱ्हाडात,

राहतेस तू एकटी |

आणि भाडे दयावे मीच,

रीत कशी ग उलटी |

… लहानतोंडी मोठा घास… सुरेश भट साहेबांच्या या चार ओळीवरून सुचलेली रचना 

– – – 

डोकावले बिऱ्हाडात,

आठवणींचा खजिना |

रमतो तुटण्यात मी,

संपता तो संपेना |

*

हिरे माणकं फिकी,

दिपतो त्या क्षणांनी |

चमक चेहऱ्यावर,

गुलाबी आठवांनी |

*

गंध बकुळ गजऱ्याचा,

मनास सुखावतो |

निर्माल्याच्या गाभाऱ्यात,

येण्यास खुणावतो |

*

भाडेकरू नव्हतीस कधी,

मालकीणच झालीस |

करारनामा फक्त चुकला,

एकटी सोडून गेलीस |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जगणे आपसुक होई सोने!!… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ जगणे आपसुक होई सोने!! ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

निर्मळ पाणी

वाहे खळखळ

धुवून टाकी

वस्त्रातील मळ!!

*

तसेच हसऱ्या 

त्यांच्या संवादी

होते आपसुक

मनही निर्मळ!!

*

शुभ्र वसन

अन शुद्ध मनाने

जगणे आपसुक

होई सोने!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares