श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ निळ्या ओळी आणि क्रूस ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

काही उतरता मनातलं

सरळ निळ्या ओळींवर,  

होतो एक कोपरा रिता

ठसठसणारा कागदावर !

*

मग वाटे मम मनाला

ते झाले हलके पिसापरी,

पडता बाहेर साऱ्या वेदना 

ज्या जपल्या होत्या उरी !

*

पण येई उगाच मनात 

विचार निळ्या ओळींचा,

होत असेल का त्रास

त्यांना माझ्याच वेदनांचा ?

*

पण विचार करता पटले 

जो तो भोग घेऊन जन्मतो,

वाटले जरी मजला वाईट 

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

जो तो आपला “क्रूस” वाहतो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments