सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री ज्योत्स्ना तानवडे
🎇 अ भि नं द न 🎇
साकव्य विकास मंचने आयोजित केलेल्या आरती लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐✒️💐
आरती लेखन स्पर्धा तृतीय क्रमांक प्राप्त आरती “श्री स्वामी समर्थ आरती” आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “श्री स्वामी समर्थ आरती” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
!! श्री !!
☆
जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया
ओवाळू आरती वंदन तव पाया ||
जय देव जय देव ||ध्रु||
*
भक्तांचा तारक तू सागर करुणेचा
मार्ग दावी सकला अनन्य भक्तीचा
दत्तात्रय अवतारी हे जगत उद्धराया ||१||
ओवाळू आरती वंदन तव पाया
जयदेव जयदेव ||
*
‘भिऊ नको पाठीशी मी‘ स्फूर्ती देतसे
‘श्री स्वामी समर्थ‘ मंत्र तारक होतसे
नाम मुखी वसो सदा मोक्षाप्रत जाया ||२||
ओवाळू आरती वंदन तव पाया
जयदेव जयदेव ||
*
अगाध महिमा तुमचा दयाघन स्वामी
मायपिता आमुचे तुम्हीच हो स्वामी
श्रद्धेचे बळ मिळो भवसागर तराया ||३||
ओवाळू आरती वंदन तव पाया ||
जयदेव जयदेव ||
*
जय जय स्वामी समर्था सद्गुरुराया
ओवाळू आरती वंदन तव पाया ||
जयदेव जयदेव ||ध्रु||
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






