सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ “एका CA आजोबांची गोष्ट…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
श्री ताराचंद अग्रवाल
चार्टर्ड अकाउंटंट होणं म्हणजे काय हे त्या मार्गाला जे गेलेत तेच सांगू शकतात. आधी फाउंडेशन मग इंटर आणि शेवटी फायनल, पास होता होता तोंडाला फेस येतो. बरेचजण तर कंटाळून सीए होण्याचा प्लॅन दुसर्या जन्मावर ढकलून देतात अशी ही स्पर्धात्मक परीक्षा! पण ते जाऊ द्या, आज वाचा वयाच्या ७१ व्या वर्षी सीए होणार्या आजोबांची गोष्ट!
निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे विश्रांती असा अर्थ लावणाऱ्या आपल्या समाजात, जयपूरच्या श्री ताराचंद अग्रवाल एक विलक्षण आणि प्रेरणादायी त्यांनी असा पराक्रम केला आहे, त्यांनी वयाच्या ७१व्या वर्षी CA ची पदवी मिळवली आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर मधून निवृत्त झाल्यावर त्यांचे अनेक कलीग निवृत्तीनंतर आराम करत होते. पण ताराचंद अग्रवाल घरी बसल्या बसल्या त्यांच्या नातीला CA परीक्षेच्या तयारीसाठी मदत करत होते. मग त्यांना वाटलं की आपणही ही सीएची परीक्षा द्यावी. आणि ते यावर्षी सीए झालेही! धन्य हो आजोबा! अभिनंदन!
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






