डॉ. शिरीन वळवडे
अल्प परिचय
म.बी.बी.स (पूर्वाश्रमीची..डाॅ.कुसुम जुगादे), सध्या दिल्लीत प्रायव्हेट प्रॅक्टीस करत आहे.
लेखिकेचे प्रकाशित साहित्य – लुप्ता, कथुल्या, सखा, सासुबाई साल मुबारक, कथागुच्छ, जिचे हाती कढई, वगैरे,एकूण तेरा पुस्तकं प्रकाशीत.
इंद्रधनुष्य
☆ “व्हेल माशाच्या तोंडात” ☆ डॉ. शिरीन वळवडे ☆
व्हेल माशाच्या तोंडात – –
एड्रियन व त्याचे वडील डॅम सिसिमॅकस हे दोघेही व्हेनेझुएलाचे रहिवासी आहेत. मॅगेलनच्या सामुद्रधुनीत ते आपआपल्या लहान बोटी घेऊन जलविहारासाठी गेले होते. एकमेकांपासून काही मीटर्स अंतरावर ते होते.
अचानक एड्रियनला जाणवलं की त्याच्यावर काही तरी आदळलं. त्याने डोळे बंद केले. डोळे उघडले, तेव्हा त्याला जाणवलं की तो त्याच्या लहानशा बोटीसह व्हेल माशाच्या तोंडात होता. त्याच्या चेहर्यावर पातळसा ब्रश फिरत असल्याचं त्याला जाणवलं. तिथे त्याला फक्त गर्द निळा व पांढरा रंग दिसला. काय करावं, ते एड्रियलला कळेना. त्यानं श्वास रोखून धरला होता. पण किती काळ त्याला श्वास रोखून धरता आला असता? त्याला काहीच करता येण्यासारखं नव्हतं. पण त्याचं नशीब थोर होतं॰ त्याला जाणवलं की तो पाण्याच्या पृष्ठभागावर येतोय. म्हणजे व्हेलने त्याला त्याच्या कयाकसह तोंडातून बाहेर फेकलं होतं.
हे सगळं दृश्य, त्याचे वडील हातबुद्ध होऊन पहात होते. नाहीसा झालेला एड्रियल पुन्हा कयाकसह पृष्ठभागावर आला, तेव्हा त्यांनी नि:श्वास सोडला. नंतर त्यांना व्हेल माशाचं धूड दूर निघून जाताना दिसलं.
उसळत्या लाटांचं चित्रीकरण करता यावं, म्हणून वडील डॅम यांनी. त्यांच्या बोटीच्या मागच्या बाजूला एक कॅमेरा बसवला होता. त्या कॅमेर्याने या विलक्षण थरारक प्रसंगाचे क्षण टिपले होते.
व्हिडिओमध्ये ते पुन्हा पाहताना, तो व्हेल मासा किती मोठा होता, ते पाहून त्यांना धक्काच बसला.
एड्रियननं नंतर बी. बी. सी. च्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, ‘तो केवळ जीवंत रहाण्याचा अनुभव नव्हता. मला जगण्याची दुसरी संधी मिळाली होती. ‘
व्हेल मासा जरी आकाराने फार मोठा असला, तरी त्याच्या गळ्याचा भाग फार लहान असतो. ते फक्त लहान मासे गिळू शकतात. माशाच्या तोंडात गेलेले लोक मरतात, कारण ते श्वास रोखून धरू शकत नाहीत. मासा त्यांना बाहेर फेकतो, कारण तो त्यांना गिळू शकत नाही.
एड्रियननं श्वास रोखून धरला व तो जीवंत राहिला. ‘ असं मत प्राणीशास्त्रज्ञांनी वर्तवलं.
एड्रियन माशाच्या तोंडातून, म्हणजेच मरणाच्या दारातून परत आला होता.
(सौजन्य – ‘विपुलश्री’ – जुलै 2026)
© डॉ. शिरीन वळवडे
मो. 9911244701
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈







