वीणा कुलकर्णी
इंद्रधनुष्य
☆ कन्यादान ☆ वीणा कुलकर्णी ☆
माहेरवाशीण येते वर्षातून एकदा
गौरीच्या सणातून..
तर कधी श्रावणी शुक्रवारच्या
कहाणीतून!
सासरी रमताच पाहुणी होऊन जाते माहेरची.
बी लावायचे, पाणी घालायचे नित्यनेमाने, मग त्याचे रोपटे तयार होते, जोपासलेल्या रोपट्याला कळी येते अन कळीचे फूल कधी होते कळतच नाही. हे फूल बाजारात विक्रीसाठी देताना मळा? रिकामा होऊन जातो. अशावेळी माळ्याची जी घालमेल होते तीच घालमेल कन्या सासरी जाताना प्रत्येक आईवडिलांची होते. पण काय करणार, आपल्या 16 संस्कारामध्ये विवाह संस्कारास अनन्य साधारण महत्व आहे. परंपरेप्रमाणे प्रत्येक मातापित्यास “कन्यादान” हे करावेच लागते. इथे मी चांगल्या अर्थाने म्हणते बरं का, “आलिया भोगासी असावे सादर” कारण “कन्या हे परक्याचे धन!!
मुलींबरोबर बागडण्यातला आनंद, बालपणीचे लडिवाळ हट्ट, छंद, सतत चाललेला चिवचिवाट हे सगळेच संपते कन्या सासरी गेली की अगदी तीन तासाच्या चित्रपटासारखे. तरी जमाना बदललाय, मुली येऊ शकतात आईबाबांकडे केव्हाही. पण तरीही विवाहित मुलगी त्यांना पाहुणीच वाटत असते. त्यांचे हे वाटणेही स्वाभाविकच असते जनप्रथेनुसार.!!! चालीरीती, परंपरा व रूढी या त्रिसूक्तीचा प्रभाव नगण्य टक्के अपवाद वगळता अजूनतरी आहे असाच आहे.
मुली माहेरी पाहुण्याच होतात.
बरोबर आहे ना ते?
☆
© वीणा कुलकर्णी
संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





