सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वार्थसौ. वृंदा गंभीर

जगी या कोणी का पार्थ आहे

सगळ्यांच्या मनी स्वार्थ आहे

काम असता करती जवळ ते

काम झाल्यावर दूर पळत आहे

*

निस्वार्थी जगी नाही कोणी

आई वडील सोडून या जणी

भाऊ बहीण राहती व्यवहारी

चतुर व्हावे व्यवहारी रहावे मनी

*

दिल्या घेतल्याचे जग सारे

आपले ना उरले कुणी खरे

निस्वार्थी सेवा करुनी जगी

पावन व्हावे सिंधुताई उगी

*

मैत्री असते निस्वार्थी खरी

एकाला दुःख झाल्या कळ

येई दुसऱ्याला हीच आस बरी

राहता येत बिनधास्त अन मोकळं

*

स्वार्थ हा कळावा प्रपंची वेड्या

स्वार्थीपणाचा कळस नसावा

स्वार्थापायी हाती पडतात बेड्या

स्वार्थ फक्त परमार्थात असावा

 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments