श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ मिरग… पहिला अतिथि… ☆ श्रीशैल चौगुले ☆

आभाळाने सांंगावे ढगाला

ढगाने बरसावे वार्यासंगे

वार्याच्या पदराने झाकावे

धरतीचे अंग चिंबून रंगे.

*

इंद्रधनू मोहवीत सृष्टीला

खळखळून वहावीत झरे

जळ काया चंचल नाचवीत

मिरग नक्षत्र पुर्वेला फेरे.

*

ढगांमागून ढग पाठशिव

कुशीत घेऊन पळती जळ

टप-टप कधी सरित दळ

ओढे नाले नदिस येती बळ.

*

डोंगर-पर्वत भान सोडून

पाउस खेळे सख्यासंग खेळ

पहिल्या आगमनी ओले-ओले

झाड-फुले स्वागता साधे मेळ.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments