सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ दिंडी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(पंचाक्षरी)
☆
दिंडी चालली,
दिंडी चालली,
पंढरपुरी,
दिंडी चालली!… १
*
वारकरी हे,
धावच घेती!
विठू राउळी,
वेगे पळती !… २
*
दिंड्या पताका,
पालख्या किती!
नाचत जाती,
तीरावरती !… ३
*
वैष्णव मेळा,
नाचतो, गातो!
विठू चरणी,
तल्लीन होतो!.. ४
*
राही विठ्ठल,
खूश मंदिरी!
आनंदे नाचे,
सारी पंढरी!… ५
*
आनंद डोही,
मनी माईना!
वारीचे सुख,
देई जनांना !… ६
*
दिंडी चालली.. दिंडी चालली…
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





