सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ शाळा… ☆ सुश्री त्रिशला शहा

निशब्द शांतता भरुन होती

वास्तु कशी ती स्तब्ध होती

नव्हता कसला दंगा नी गोंधळ

शाळेत नव्हती कसली लगबग

 *

जून महिना दारी आला

शाळेला नवा हुरुप आला

पाखरांचा किलबिलाट चालला

पटांगणावर खेळही रंगला

 *

नवी इयत्ता, नविन गणवेश

नविन पुस्तक, नविन दफ्तर

उत्साहाच जणू बांध फुटला

सुरू झाली ती शाळा आता

 *

बाकांचा आवाज चालला

टेबल खुर्चीचा नाद उमटला

भिंतींनाही आवाज फुटला

घंटेमधूनी आवाज निनादला

लगबग लगबग चालू झाली

शिक्षक, मुले गट्टी जमली

पुस्तकांची पाने उलटली

शाळा आता सुरू झाली

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments