श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ वारीचा विठ्ठल… ☆ श्रीशैल चौगुले ☆

माझीया पंढरित

साता जन्माचे सुख

भक्तीत होता दंग

शमे तहान-भुख.

*

वाट होतसे दिंडी

आभाळ पांडुरंग

वीट धरती होई

ताल धरी अभंग.

*

टाळ-चिपळी नाद

आत्मरंगी ती साद

विठ्ठल नाम गजर

वारी भक्तास दाद.

*

आषाढ नि कार्तीकी

पुण्य मिळे कर्माशी

पंढरी होई स्वर्ग

नाही भेद धर्माशी.

*

संतांचीच पाउले

कधी न थके वारी

लहान थोर नाचती

गजर नाम फेरी.

*

सावरतो संसार

पंढरिचा हा राजा

देवलोक उतरे

पंढरपुरी प्रजा.

*

धन्य नेत्र सोहळा

सृष्टी कण विठ्ठल

जन्मो जन्मी लाभावा

हेच रुप विठ्ठल.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments