सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “प्रभुजीच्या मना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
मन काहुर काहुर मन उगा धास्तावते
प्रभुजीच्या मना आले तेच तेच रे घडते
*
इस्कटल्या इचाराचा तुझ्या डोक्यात रे गुंता
येड्या सोड हे सगळं शरण जाय भगवंता
*
अंगामध्ये होतं बळ लई मारील्या फुशार्या
क्षणाक्षणाला भगवंत देत होता रे इशारा
*
त्याची करणी का कधी अशी कोणाला कळली
आता होत आता नाही जणू जादू की जाहली
*
सारे सोडावे त्याचे ठाई करा चोख रे विचार
नित्य नेमाने करावा सदाचाराचा आचार
*
माय माऊली होऊन घेतो भक्ताला पोटाशी
त्याचे करावे स्मरण नव्या प्रत्येक दिवशी
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




