सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ गुरु शिष्य… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
गुरु शिष्य नाते l माय लेकराचे l
उदंड प्रेमाचे l निर्हेतुक ll…..१
*
गुरूसाठी शिष्य lआटापिटा करीl
करतो चाकरी lगुरु पायीं ll…२
*
गुरुला शिष्याचीlजाण असे भारीl
संकटात तारी lगुरु राया ll….३
*
गुरुविना शिष्यlजळावीण मासा l
तळमळे असा l प्रेमा साठी l l..४
*
रामदास स्वामीlभक्त तो कल्याण l
गुरु शिष्य जाण l नामांकित ll…५
*
श्रीरामाची सेवा l मारुती ने केली l
दास्य भक्ती झाली l निरंतर ll…६
*
गुरु पौर्णिमेला l गुरुसी भजावे l
प्रेमे आळवावे lगुरु राया ll…७
☆
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





