श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ ओझं … ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
अनमोल दुर्लभ
विचार येती दारी
म्हणती साधका
यावे का तव अंगणी…
*
साधक तो ॐ आईंचा
होती विचारांची प्रगल्भता,
व्यष्टी सोडून समष्टीत रमतो,
म्हणोन दाटी झाली अंगणी आता…
*
तेजाची प्रभा फाकली
भाली आत्मज्ञानाची
सातत्य साधनेचे,
कृपा होय ही सदगुरुंची…
*
रंगमंच जीवनाचा
फिरत होता सतत
वठवित भूमिका सहज,
अर्पूनी कर्म जगजेठीस…
*
आता न व्यवहार
न देणे-घेणे, न तूझं माझं
शून्यचि अवघे,
मी तू चे लया गेलं ओझं…
☆
© श्री अनिल वामोरकर
१-६-२०२५
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




