श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
🦚 आला श्रावण श्रावण! 🌴 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
☆
आला श्रावण श्रावण
धरली पावसाने धार,
नव्या नवरीच्या मनी
नाचे आनंदाने मोर!
*
आला श्रावण श्रावण
सय येते माहेराची,
दारी उभी वाट पाहे
माय तिची कधीची!
*
आला श्रावण श्रावण
सख्या माहेरी भेटतील,
होतो सासरी का जाच?
लाडे लाडे पुसतील!
*
आला श्रावण श्रावण
सण ये मंगळागौरीचा,
पुजून देवी अन्नपूर्णेला
रात खेळून जागायाचा!
*
आला श्रावण श्रावण
व्रत वैकल्याचा मास,
ताबा ठेवून जिभेवर
करा उपास तापास!
करा उपास तापास!
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




