सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ तोच एक सावळा… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

विठ्ठलाचे हे रूप,

असे सावळे सुंदर…

गळा तुळशीमाळ अन्,

कासे पितांबर…

*

रूप सावळे साजिरे की,

भास होतसे कान्हाचा….

दोन्हीं तयाचीच रूपे,

वेध घेतसे मनाचा….

*

मन सावळे नी ही,

हा देहही सावळा….

कटीवर हात ठेऊनी,

वाही भार विश्वाचा….

*

भक्त असे हे वेडे,

होती तुझ्यात दंग….

मुखावर तुझ्या शोभे,

हा कस्तुरीचा गंध….

*

सावळ्याची मोहिनी,

भिनली ध्यानी मनी….

देहात असूनी विदेही,

ही संवेदनाच न्यारी….

*

जो तो घेई अशी,

तुझ्या चरणाशी धाव….

पाव आता विठ्ठला,

आर्त झाला भाव…..

*

विठ्ठला बा विठ्ठला,

धाव पाव आता…

भक्तांच्या मेळ्यामध्ये,

तूच एक सावळा…..

तूच एक सावळा…..

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments