श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ माझा लपला पाऊस… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
तुझ्या सहवासा करता,
लांबविन मी रात्रीला.
खास भेटीसाठी तुझ्या,
थांबवीन मी चंद्राला.
वाट पाहता भेटीची,
थबकला काळ, थबकले क्षण.
भेट घडो वा ना घडो,
प्रतीक्षाच विलक्षण.
झाले कासावीस प्राण,
अडकले जसे श्वास.
छळवादी कवितेच्या,
दंतकथांचे आभास.
थांब सखे थोडी,
नको सोडून जाउस.
मेघा आड तुझ्यासाठी,
माझा लपला पाऊस.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



