श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ जागतांना या कळ्यांना... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
जागताना या कळ्यांना दु:ख कधी ना वाटते
खेद नाही, आयुष्य यांना अल्पसे जरी लाभते
फुल होता रुप आणि रंग सारे उधळिती
गंध लाभे जीवनाला जरी पाकळ्या कोमेजती
बोध घ्यावा, तत्त्व ऐसे जीवनाचे सांगती
कर्म मोठे! व्यर्थ सारे सांगणे,
मी पहा जगलो किती
मी पहा जगलो किती.
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




