सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ नाद मुरलीचा ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नाद मुरलीचा येता कानी,

हरखून गेली राधा राणी!

कृष्ण सख्याची चाहूल येता,

नदी तिरी राधा गेली झणी!…१

*

कदंब वृक्षावरती होती,

स्वारी बसली,मुरली हाती!

चेहऱ्यावर खट्याळ हासू,

पाही राधेची निस्सीम प्रीती!..२

*

बावरलेली राधा गौळण,

शोधीत होती कृष्ण पाऊले!

खूण प्रेमाची दिसता डोळा,

बासरी सूर मनी हासले!..३

*

मोरपीस उजळले शिरी,

राधेचे डोळे चकीत झाले!

राधा राधा नाद तो उरला,

शाम सुंदर डोळा दिसले!..४

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments