सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गझल… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(भुजंगप्रयात – लगागा=४)
☆
नको बंगला अन नको सात बारा
जगी पाखरांचा न काही पसारा
*
स्वइच्छा तुझी लोकसेवा घडावी
कसा वाजवावा स्तुतीचा नगारा
*
इथे बर्फही चेतवी आग मोठी
तुला सावराया पुरेसा इशारा
*
जळो रोम कोठे मला काय त्याचे
उदासीन वृत्तीस द्यावा न थारा
*
किती पाजता ज्ञान अमृत मुलाला
पचावा कसा औषधी खूप मारा
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




