श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ तूच... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
तू
तू विचारलस, ” काय पाहिलंस माझ्यात ?”
तूच सांग, काय पाहतो आपण
पौर्णिमेच्या चांदण्यात?
श्रावणातल्या सरीत?
इंद्रधनुच्या सप्तरंगात?
तुझ्या डोळ्यांच्या डोहात पाहतोय
माझ्या स्वप्नांच प्रतिबिंब
तुझ्या सहवासाच्या जाणीवेत फुलतोय
माझ्या मनाचा गुलमोहर
तुझ्या स्मिताच्या हिंदोळ्यावर हेलकावतोय
माझ्या मनाचा पक्षी
तुझा प्रत्येक पदन्यास जणू माझ्या
जीवन पथावरील नाजूक नक्षी
आणि तरीही तू विचारतेस
” काय पाहिलंस माझ्यात?”
सारं काही स्पष्ट दिसेल
जर पाहिलंस माझ्या मनाच्या दर्पणात
सर्वत्र तूच माझ्या मनात
कणाकणात
रोमारोमात
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





सुंदर कविता आहे सर!