श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 😞🕺स्थि त्यं त र🫡 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
कुंकू गेले टिकली आली
ती ही न्हाणीघरात गेली,
अवघी न्हाणी स्वतःला
सौभाग्यवती म्हणू लागली!
*
स्कर्ट गेला, साडी गेली,
गायब झाला फ्रॉक,
पंजाबी ड्रेसमध्ये मग
पोरी करू लागल्या रॉक!
*
फेटा उरला कार्यापूरता
दिवस टोप्यांचे सरले,
तरुण वयातच पोरांना
टक्कल पडायला लागले!
*
इंटरनेट, कॉंमप्युटरमुळे
जग फारच जवळ आले,
गर्दीतल्या सर्व माणसांचे
माणूसपणच घेवून गेले!
*
वैज्ञानिक प्रगतीमुळे
कष्ट फारच कमी झाले,
सामान्य लोकांच्या जीवनात
मरण फक्त स्वस्त झाले! 😔
मरण फक्त स्वस्त झाले! 😔
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




