सौ. मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ गीत मंजुषा… ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆
☆
गीत मंजुषा आवडीची
मनामनांत गुंजन करी
शब्द मंजुषा भावनांना
मनापासून स्पर्श करी
*
प्रश्न मंजुषा सोडविता
ज्ञानलालसा उमलते
धन मंजुषा मिरवणे
सर्वथा अयोग्य असते.
*
चैतन्य मंजुषा सर्वांची
सदा फुलत राहताना
नित्य नवे शिकत राहू
सोनं चांदणे वेचताना.
*
आपणच भाग्यविधाते
जीवनाचे ही शिल्पकार
मंजुषा सोबतीला आहे
स्वप्नांना करण्या साकार.
☆
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






