श्री आनंदराव रघुनाथ जाधव

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्य… ☆  आनंदराव रघुनाथ जाधव ☆

मन भरून आलं तर

मन जाणणार

एक तरी आपला असावा

*

मित्र भरपूर असतात

आयुष्यभर साथ देणारा

एक तरी मित्र असावा

*

प्रेम तर सर्वच करतात

पण हळव्या मनाला जपणारा

एक तरी जीवलग असावा

*

सभोवताली भावकी

भरपूर असते पण

एक तरी निस्वार्थी नातलग असावा

*

आयुष्याच्या वाटेवर

अनेक भेटतात पण आधार देणारा

एक तरी वाटसरू असावा

*

उन्हं वारा थंड सोसताना

सोबतीला हक्काचा

एक तरी माणूस असावा

*

धावपळीच्या जगात

दमल्या नंतर विश्रांती घे म्हणणारा

एक तरी घरचा प्रेमळ असावा

*

भरल्या संसारात मुलं मुली असतात

पण दुःखी मनाला फुंकर घालणारा

एक तरी जीवाचा तुकडा असावा

© श्री आनंदराव रघुनाथ जाधव

सांगली ८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments