श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ खरे सुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
कुणी मांडला खेळ
निघून जातो वेळ
आयुष्याच्या स्वप्नांची
घालीत जीव मेळ.
*
सारे असते खोटे
खरेच भासे मना
प्रत्येक क्षणो-क्षणी
संसार लोभी गुन्हा.
*
मागे फिरावे कसे
वय सरत गेले
नियतीची बंधने
जन्म हरत गेले.
*
धन लौकिक श्रेष्ठ
कसले आले सुख
घास प्रेम निःस्वार्थी
फक्त तहान भूक.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




