श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “कविता…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

संस्काराचा दिवा लावणाऱ्या घरावर

मी लिहिली एक उजेडाची कविता

आयुष्याची जळून राख झाली यार

आणि धुरासारखी विझून गेली कविता

*

तो पतंग ढगाशी काय बोलतो आहे..?

मांज्यासारखी तुटून गेली कविता

वास्तवावर विस्तव ठेवून रडलो किती यार

स्मशानातल्या चितेवर जळून गेली कविता

*

ती माझीच होती याचा कुठे शोधू पुरावा?

माणूस शोधताना हरवून गेली कविता

आईच्या गर्भात मी अल्लडपणा केला रे यार

पण बापाच्या खांद्यावर बसून गेली कविता

*

कोण आले रे हे मारेकरी मानवतेचे..?

मग चवताळून जागी झाली कविता

प्रेम करणाऱ्या पाखरांना वाचवण्यासाठी यार

धावत धावत पुन्हा आली माझी कविता…

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments