श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ नववर्ष… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
उत्पत्ती तेथे लय
लय तेथे उत्पत्ती
वर्ष बाविसचा लय
वर्ष तेविसची उत्पत्ती…
*
आत्मा तोच
वसन बदलले
तैसेचि हेही वर्ष
आकडे बदलले..
*
गताची नको खंत
स्वागतम् येणा-याचे
नवी उभारी, नवे संकल्प
कवच आहे सद्गुरुंचे…
*
किती गेले, येणार बरेच
भूतकाळात जमा हे वर्ष
असतील केल्या चुका अनेक
सुधारून त्या क्रमूया नववर्ष…
*
आणू तिव्रता साधनेत,
रिपूंना देवू मूठमाती,
नका दवडू वेळ,
सदगुरु आहेत सांगाती…
☆
* नववर्षाच्या मन: पुर्वक शुभेच्छा *
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





