श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ ओल…! ☆ श्री सुजीत कदम ☆
(छंद : अष्टाक्षरी…)
☆
प्रेम गुलाबाचे फूल
तुझ्या गाली फुललेले
एका एका पाकळीत
आठवांनी नाहलेले…!
*
प्रेम कवितेचे घर
सुख दुःखाचे माहेर
कधी आसू, कधी हासू
देई ओठांनी आहेर…!
*
प्रेम सागराची गाज
त्याला किनारी आसरा
नको नदी आसवांची
हवा चेहरा हासरा…!
*
प्रेम गुलाबाचा काटा
काढी काट्यानेच काटा
तुझ्या डोळ्यात फुलल्या
जीवनाच्या ओल्या वाटा…!
*
दव बिंदू पुरे एक
घेतो टिपूनीया प्रेम
ओल काळजाची माझ्या
माझ्या शब्दात सप्रेम…!
☆
© श्री सुजित कदम
पुणे
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







छान आहे कविता