श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ काव्यदर्पण… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
भाव अंतरीचे उमटता मनी
साद हृदयात समेटतो ध्वनी.
*
दिशा नजरेत स्पंदनांचे शब्द
काव्य गुंफताना भावनांचे ऋणी.
*
बंध रेशमांचे सोयरिक नवे
भेट आयुष्याची आठवण जुनी.
*
ऋतू बहरात पाखरांची झेप
रंग संसारात पंखवेल वेणी.
*
ध्येय आभाळाचे गाठताना ओळ
धुंद लेखणीची भिजरी पापणी.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





